ट्रकच्या जोरदार धडकेत टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या थेट शरीरात घुसल्या !! नाशिक अपघाताची थरारक कहाणी !!
नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जानेवारी २५ सोमवार
नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला असून रात्री आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका जास्त भयंकर होता की,लहान मुलांच्या अंगामध्ये सळ्या घुसल्या.काहीजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातात १३ जण गंभीर जखमी आहेत.मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर ही अपघाताची घटना घडली आहे.निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाच्या कार्यक्रमासाठी हे सर्वजण गेले होते.धारणगावला जाण्यासाठी एक महिलांचा टेम्पो तर दुसरा पुरुषांचा टेम्पो होता.कार्यक्रम आटपून हे सर्वजण नाशिकच्या दिशेने निघाले होते.द्वारका उड्डाणपुलावर टेम्पो आला त्यावेळी त्यांच्यापुढे एक आयशर होते व हा आयशर लोखंडी गजाने भरलेला होता.उड्डाण पुलावर येताच टेम्पो चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली यावेळी आयशरमधील लोखंडी सळ्या थेट टेम्पोमध्ये घुसल्या आणि टेम्पोत बसलेल्यांच्या अंगात शिरल्या यावेळी जागीच काही मुलांनी जीव सोडला.
लोखंडी गजाने भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरुन जात होता.टेम्पो चालकाला त्याचा अंदाज आला नाही आणि लाल रंगाचे कोणतेही कापडही लावण्यात आले नव्हेत.टेम्पोच्या काचा फोडून सळ्या आत शिरल्या.मुलांच्या शरीरात सळ्या शिरल्याने अनेकांचा जागीच मृत्यू झाला.सिडको आणि अंबड भागात हे सर्वजण राहतात आणि हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती मिळत आहे.या अपघातात अतुल मंडलिक,संतोष मंडलिक,यश खरात,दर्शन घरटे, चेतन पवार अशी मृतांची नावे आहेत तर जखमींवर उपचार सुरू आहेत.शरीरात गज शिरल्याने प्रचंड रक्तस्राव झाला.या मुलांनी सकाळी जातांना एक व्हिडीओ तयार केला असून या व्हिडीओमध्ये सर्वजण मस्ती करतांना दिसत आहेत व तो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडीओ ठरला.या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली मात्र या अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.