बोनकोडे गावाकडे जाणाऱ्या पाम बीच रोडवर स्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली.या अपघातात मरण पावलेली संस्कृती कामोठे सेक्टर १८ मधील रहिवासी होती तर अंजली कोपरखैरणेमधील बोनकोडे गावात राहत होती.तुर्भे एमआयडीसीमध्ये रात्रीची शिफ्ट संपवून या दोघी घरी जात होत्या.संस्कृती अंजलीला तिच्या घरी सोडून कामोठ्याला जाणार होती मात्र अंजलीला बोनकोडेला सोडण्यासाठी निघालेली संस्कृती पाम बीच रोडवर विरुद्ध मार्गावरून स्कूटर चालवत होती त्याचवेळी एका स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली व या अपघातात दोघी ठार झाल्या.संस्कृती खोकले अनेकदा अंजलीला घरी पोहोचवून तिच्या घरी जात होती. आजही त्या दोघी नेहमीप्रमाणे घरी निघाल्या होत्या मात्र पाम बीच रोडवर त्यांचा अपघात झाला त्यांना धडक देऊन कारचालक तिथून पळून गेला त्याच्यावर कारवाई व्हायला हवी असे या दोन्ही मुलींचा कार्यालयातील सहकारी चिन्मय गढवी याने म्हटले आहे.संस्कृतीने कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रोडवर स्कूटर उतरवली त्यानंतर ती बोनकोडे गावाकडे जाण्यासाठी आरंजा सर्कलवरून विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत होती त्याचवेळी एका स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली.दरम्यान पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की स्कोडा कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला.आम्ही त्या कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कारचा नंबर व त्या चालकाला शोधण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेले फूटेज तपासत आहोत असे  एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले.सध्या अज्ञात आरोपीविरोधात कलम २८१,१२५ (अ),१२५ (ब) व १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.