यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जानेवारी २५ बुधवार
येथील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या शहरातील विस्तारित वसाहतीत पेट्रोल पंप समोरील हरीओम नगर मधील फ्लाईट बनवण्याचे दुकानात काल रात्री भिषण आग लागून सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.दरम्यान घटनास्थळी भेट देवुन शासकीय पातळीवर आगीचा पंचनामा यावल शहरातील तलाठी गजानन पाटील यांनी केला आहे.
शहरातील विस्तारित भागात असलेल्या हरिओम नगरात गट नंबर ५० मधील प्लॉट नंबर पाचमध्ये स्लाईट बनवणाऱ्या दुकानात दि.१४ चे पहाटे दोन वाजेचे सुमारास सर्किटने आग लागली व यात पत्रांचे शेड दहा क्विंटल सलाइटिंग ७० दरवाजे यासह मशनरी लाईव्ह आधी जळून खाक झाले.दरम्यान सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.सर्जरी ग्लास व अल्युमिनियम असे दुकानाचे नाव असून दुकान मालक शेख जाकीर शेख कमरोद्दिन आणि शेख अस्लम शेख जाकीर हे आहेत.यांनी चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून चार लाख रुपये कर्ज घेतले होते तर दोन महिन्यापूर्वी बडोदा बँकेतून दोन लाख रुपयांचा उचल केलेला आहे असे एकूण सहा लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे कच्चे मटेरियल धरून दुकानात आठ ते दहा लाखाचा होता सुदैवाने मोठा अनर्थ टळला.दुकानाच्या बाजूस असलेल्या अंजली गोपीनाथ सोनवणे यांचा रहिवास आहे त्यांच्या घरात दुकाना लगतच किचन रूम होते या किचन रूममध्ये गॅस हंडी आहे.सुदैवाने येथे काही नुकसान झाले नाही घटनास्थळी यावल नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष इकबाल खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटी देऊन दुकान मालकांचे झालेल्या नुकसानाबाबत खंत व्यक्त केली त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.