Just another WordPress site

अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेतील घरात मध्यरात्री चाकू हल्ला !! हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१६ जानेवारी २५ गुरुवार

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला असून वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला व या हल्ल्यात तो जखमी झाला आहे.काल गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असतांना ही घटना घडली आहे.सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता व त्याने सैफवर चाकूने हल्ला केला.घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

लीलावती हॉस्पिटलमधून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली असून सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले.त्याला सहा जखमा झाल्या आहेत त्यापैकी दोन जखमा खोल आहेत.एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे.आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ.निरज उत्तमानी म्हणाले.न्यूरोसर्जन नितीन डांगे,कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल असेही डॉ.नीरज उत्तमणी यांनी सांगितले आहे.

सैफ अली खानवर चाकू हल्ला,खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट !!

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आहे यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी त्याच्या कुटुंबाशी संवाद !!

Supriya Sule and Saif Ali Khan

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी मी संवाद साधला मात्र त्यांची प्रायव्हसी ही महत्त्वाची आहे.काही वेळातच त्यांच्याकडून आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल.सैफ अली खान सेफ आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत मात्र त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृतरित्या याची माहिती येईल तोपर्यंत आपण वाट बघू.हल्ला कसा झाला ? काय घडले मला माहीत नाही.ही घटना चिंता वाटणारीच आहे.याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ द्या त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची ? गृहमंत्र्यांशी बोलायचे का ? हे मी ठरवेन असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.