Just another WordPress site

सावखेडासिम येथे गुरांच्या गोठयात विषारी औषध सेवन करीत एकाची आत्महत्या !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ जानेवारी २५ गुरुवार

तालुक्यातील सावखेडासिम येथील ४२ वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील सावखेडासिम येथे राहणारे किरण उत्तमराव पाटील वय-४२ वर्ष याने त्याचे स्वतःचे गुरांचे गोठात असलेले विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्यास तात्काळ उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्याची प्रकृती गंभीर असल्यानंतर पुढील उपचारासाठी किरण पाटील यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता काल दि.१५ रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास तो मयत झाला.याबाबतची खबर दिनेश पाटील यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत किशोर पाटील यांचा लहान भाऊचा देखील आठ ते दहा वर्षांपूर्वी विहिरीत पडून मृत्यु झाला होता अशा प्रकारे या दोघे भाऊंचा मृत्यु हा आत्महत्या करून झाल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.किशोर पाटील यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.