यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता. त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे.दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.हत्या करणे, हत्येचा कट रचणे,पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख,पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे.