सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुरुवातीच्या तपासात असे दिसत आहे की,हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या फायर एस्केप पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता.ही घटना मध्यरात्री अडीच वाजता घडली.चोरट्याला पाहून घरातील मदतनीसने आरडाओरडा करत मदतीसाठी अलार्म वाजवला यानंतर सैफ अली खान खोलीत गेला तिथे त्याची चोरट्याबरोबर झटापट झाली.यादरम्यान त्याने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले तसेच घरातील मदतनीसही जखमी झाली आहे तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली आहेत.आरोपीचा पहिला फोटो पोलिसांनी प्रसारित केला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.या आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफ व त्याच्या घरातील मदतनीस असे दोघेही जण जखमी झाले.मदतनीस किरकोळ जखमी झाल्याने तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे तर दुसरीकडे सैफ गंभीर जखमी असल्याने अद्याप लीलावती रुग्णालयात आहे.