लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही ?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही ? याबाबत भाष्य केले आहे.आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, “आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे.आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र तोपर्यंत तरी लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत” अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ?

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान दिला.आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता राज्य सरकार २६ जानेवारीच्या आधी वितरित करण्यास सुरुवात करेल यासंदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झाले आहे त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहि‍णींना लाभ देण्यास २६ जानेवारीच्या आधी सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

लाडक्या बहिणींना तूर्त दीड हजारच !!

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळवून देणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना दिल्या जाणाऱ्या निधीत सध्या तरी कोणतीही वाढ होणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव हप्त्यासाठी काही तरतूद राज्य सरकार करणार का ? तसेच त्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार का ? हे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच स्पष्ट होईल.