दरम्यान मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांपैकी दुसरा निर्णय कागल तालुक्यातील सरकारी होमिओपॅथी महाविद्यालयाबाबतचा असून मंत्रिमंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव येथे होणारे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय पिंपळगाव खुर्द येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.याचबरोबर यासाठी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान ऑक्टोबर २०२४ मध्ये गेल्या सरकारच्या कार्यकाळात कागल तालुक्यातील सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि ५० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता याच्या जागेत आता बदल करण्यात आला आहे.