जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मागील काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असाच एक अपघात जालना जिल्ह्यात घडला आहे.या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.भरधाव आयशर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे.या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दि.१७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा रोडवर हा अपघात झाला.भरधाव आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक झाली होती.हा अपघात एवढा भीषण होता की आयशरच्या धडकेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघातात तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातातील सर्व मृत व्यक्ती हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रहिवाशी होते.या अपघातात परवीन बी राजू शहा,आलिया राजू शहा,मुस्कान राजू शहा,कैफ अशपाक शहा आणि मनीषा तिरुखे अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.या अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.