पोलिसांनी ६९ वर्षीय गोपन स्वामी यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कबर उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा गोपन स्वामी यांची पत्नी सुलोचना आणि मुले राजसेनन आणि सनंदन यांनी विरोध केला होता मात्र त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली.दरम्यान वैकुंड स्वामी धर्म प्रचार सभाचे अध्यक्ष विष्णुपुरम चंद्रशेखरन यांनी यासंदर्भात बोलतांना सांगितले की,आम्ही शुक्रवारी महासमाधीची योजना आखली,ज्यात अनेक स्वामी आणि आश्रमाचे प्रमुख उपस्थित राहतील.त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला हे निष्कर्ष त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याशी जुळतात.एका अध्यात्मिक गुरूचा अपमान झाला असून त्यांना महासमाधी देण्यात येणार आहे.गोपन स्वामींनी समाधी घेतली होती त्यावरून वाद निर्माण झाला.मात्र यामध्ये वाद करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबर पाडण्यात आली !!

गोपन स्वामींनी समाधी घेतल्याच्या दाव्यानंतर पोलिसांकडून ही समाधी खोदण्यात येण्याच्या विरोधात गोपन स्वामी यांच्या कुटुंबीयांनी थेट केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पोलिसांना समाधी खोदण्यास किंवा उत्खनन करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी केली मात्र या प्रकरणात न्यायालयाने तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला तसेच बेपत्ता झालेल्या किंवा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा समावेश असलेल्या प्रकरणांचा तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना असल्याचे न्यायालयाने म्हटले होते तसेच या प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटत असल्यामुळे तपास थांबवता येणार नाही असे  म्हटले होते.