सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता.यापूर्वी सैफची बहीण सबा पतौडी हिने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत त्याला पूर्वीपेक्षा बरे वाटत असल्याचे सांगितले होते.दरम्यान मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाणे येथून अटक केली होती.शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली.१६ जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता.या दरम्यान त्याने विजय दास,बिजॉय दास,बीजे आणि मोहम्मद इलियास अशी अनेक नावे वापरली होती.गुरुवारी १६ जानेवारी रोजी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर हा हल्लेखोर चोरीसाठी घुसला होता.यावेळी सैफ अली खानने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला तेव्हा हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफशिवाय या घटनेमध्ये त्याच्या घरातील मदतनीस सुद्धा जखमी झाली होती त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढे लीलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

दरम्यान अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून आज मंगळवारी २१ जानेवारीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची पहिली झलक समोर आली आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर आला आहे.१६ जानेवारी रोजी मध्यरात्री त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सैफ छोट्या तैमूर आणि इब्राहिमसोबत रुग्णालयात पोहोचला होता. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानचा पहिला फोटो समोर आला आहे.रुग्णालयातू बाहेर पडताना त्याची झलक मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.१६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या राहत्या घरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

पाच दिवसांनंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज !!

सैफ अली खानला १६ जानेवारीला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर १७ जानेवारीला पहाटे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता.आरोपीने त्याच्या पाठीमध्ये खुपसलेल्या चाकूचा तुकडा अडकला होता हा अडीच इंचाचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढला त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते.सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याच्या प्रयत्नात शरीफुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने १६ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरी घुसखोरी करत त्याच्यावर चाकूहल्ला करत त्याला गंभीर जखमी केले.हल्लेखोराने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले होते आणि यामुळे जेव्हा त्याला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा भरपूर रक्तस्त्राव झाला होता.सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ ​​बिजॉय दास (वय ३० वर्ष) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हल्लेखोर बांगलादेशातील कुस्तीगीर !!

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने पोलिसांना सांगितले की,तो बांगलादेशातील खेळाडू आहे व तो बांगलादेशातील कुस्तीपटू होता.तो कमी वजनाच्या गटात कुस्ती खेळायचा.तो जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती खेळायचा.कुस्तीगीर असल्याने सैफ अली खानच्या शरीरयष्टीवर तो भारी पडला.बेरोजगारीमुळे भारतात आला पण इथेही त्याला चांगले काम मिळाले नाही त्यानंतर त्याने चोरीचा प्लॅन आखला.