Just another WordPress site

ऐकावे ते नवलच : नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ !!

उत्तरप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ जानेवारी २५ शनिवार

नवऱ्याच्या सततच्या व्यसनाधीनतेला कंटाळलेल्या दोन महिलांनी आपापले घर सोडून एकमेकींशी लग्न केल्याचा अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे घडला आहे. कविता आणि गुंज अशी दोघींची नावे असून देवरिया येथील छोटी काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिव मंदिरात दोघींनीही एकमेकींशी लग्नगाठ बांधली.यावेळी गुंजने नवऱ्याची भूमिका साकारात कवितेला सिंदूर लावले आणि मग दोघींनी एकमेकांना हार घालून सात फेरे घेऊन विधीवत लग्न केले.या दोनही महिला त्यांच्या नवऱ्याच्या व्यसनाधीनता आणि सततच्या छळाला कंटाळल्या होत्या.सहा वर्षांपूर्वी दोघींची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती व त्यानंतर त्यांनी घर सोडून एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.दोघींनाही पतीकडून कौटुंबिक अत्याचाराचा सामना करावा लागला अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान नवऱ्याच्या रोजच्या अत्याचाराला आम्ही कंटाळलो होतो.दोघींपैकी एकीला चार मुले आहेत तिने अत्याचाराला कंटाळून माहेर गाठले होते तर दुसरी महिलाही नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळली होती व तिच्यावर सतत व्याभिचाराचे आरोप नवरा करत होता असे तिने सांगितले.गुंजने पीटीआयशी बोलताना सांगितले की, आम्ही नवऱ्याच्या व्यसन आणि छळाला कंटाळलो होतो व यापुढे आम्हाला आमचे आयुष्य शांतपणे आणि आनंदात घालवायचे आहे.आम्ही आता गोरखपूर येथे एकत्र राहणार असून जगण्यासाठी इथेच काम करणार आहोत.गोरखपूरमध्ये आमचे घर नाही पण भाड्याने राहून आम्ही पुढचे आयुष्य व्यतित करू.शिव मंदिराचे पुजारी उमाशंकर पांडे यांनी सांगितले की,दोन्ही महिलांनी लग्नासाठीचे साहित्य स्वतःबरोबर आणले होते व त्यांनी विधी पूर्ण केल्या आणि त्या दोघी निघून गेल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.