अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ जानेवारी २५ शनिवार
महायुती सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते पण सत्ता स्थापन होताच राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मात्र मी कधीच कर्जमाफी देईल असे कधी बोललोच नसल्याचे सांगितले.“माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीबद्दल ऐकले का?” असे विधान अजित पवार यांनी केले होते.या विधानावर बोलत असतांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरीच मूर्ख असल्याचे संबोधले आहे.अमरावती येथे पत्रकारांशी बोलत असतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,या सरकारने आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी,व्याज माफीचे आश्वासने दिली होती.साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली.मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले ? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय ? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते तसेच कर्ज माफी करणार नाही असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले.ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय ?.निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जर शेतकरी वागणार असतील तर ते भोगावे लागणारच शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहीजे.मी सत्य बोलल्यामुळे लोक मला शिव्या घालतील त्याची मला अजिबात पर्वा नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
एसटी भाडेवाड का केली? याचा खुलासा करावा !!
राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात १५ टक्क्यांची भाडेवाड केली असून यावरही प्रकाश आंबडेकर यांनी आपले मत व्यक्त केले.आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एसटी नफ्यात आहे असे म्हणत होते.मी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी भेट झाली असतांना मी त्यांना महिलांना ५० टक्के सूट दिल्याबद्दल प्रश्न विचारला होता त्यावर ते म्हणाले होते की,ही सूट दिल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली असून १५० कोटी दिवसाला तोट्यात जाणारी लाल परी महिन्याला ४० कोटी नफ्यात आली असल्याचे ते म्हणाले होते.मग विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसटीच्या तिकीट दरात वाढ का करत आहेत ? आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.एसटी हे सर्वसामान्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे.जर १५ टक्के भाडेवाढ केली असेल तर ती का केली ? याचा खुलासा करायला हवा अशी मागणीही त्यांनी केली तसेच सर्वसामान्य लोकांनीच भाजपाला निवडून दिले त्यामुळे या महिन्यात त्यांनी पेढे वाटावेत आणि एप्रिल महिन्यात रडण्याची तयारी ठेवावी अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…” प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप !!
“मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले पण त्यांनी भाजपाला कधी लक्ष्य केले नाही.भाजपा एकेकाळी मनोज जरांगेंना मान्यता द्यायला तयार नव्हते तरीही त्यानांच तुम्ही सत्तेवर बसवले” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा जिल्ह्यातून मोर्चे निघत आहेत तसेच या मोर्चात परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशीही मागणी केली जात आहे. यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,आपण एकदा मागण्या केल्यानंतर कारवाईची सुरुवात झाल्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत थांबायला हवे.ज्यावेळेस प्रसंग घडला त्यावेळेस काहीच केले नाही पण नंतर मोर्चे वैगरे काढणे योग्य नाही.संतोष देशमुख आणि सुर्यवंशी ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत.
शेतकरी मूर्ख आहेत !!
तसेच कर्जमाफी विषयावर बोलत असतांना प्रकाश आंबडेकर यांनी शेतकऱ्यांना मूर्ख असल्याचे संबोधले.ते म्हणाले,या सरकारने आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी,व्याज माफीचे आश्वासने दिली होती.साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली.मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले ? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय ? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते तसेच कर्ज माफी करणार नाही असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय ? असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.