Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ जानेवारी २५ रविवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज भारतीय प्रजासत्ताकदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींची शाळा

येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नशिबशहा फकीर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून ध्वजास सलामी देण्यात आली.यावेळी केंद्र प्रमुख महंमद तडवी,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे, तलाठी गजानन पाटील,ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,अनिल पाटील,लुकमान तडवी,राहुल आढाळे,जितेंद्र सोनवणे,मुख्याध्यापिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,मोहिनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज 

येथील ध्वजारोहण अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामूहिक राष्ट्रगीत व इ.दहावीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सामूहिक परेडच्या माध्यमातून सलामी देण्यात आली.त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन व संविधानावर आधारित घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालक चिंधू झांबरे,प्रमोद झांबरे,एम.ओ.राणे,दिनकर चौधरी,शरद राणे,सुदाम राणे,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे, तलाठी गजानन पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,नशिबशहा फकीर,महिला महाविद्यालय प्राचार्य डी.जी.भोळे,ज्यु.कॉलेज मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपशिक्षक एन.व्ही.वळींकर,रामेश्वर जाणकर,आर.पी.चिमणकारे,पी.पी.कुयटे,विवेक कुलट,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे,सोनाली फेगडे,चेतन चौधरी,सचिन भंगाळे,महिला महाविद्यालय प्राध्यापक एस.बी.ढाके,विनोद मोरे,विजय वाकेकर,शकुंतला भारंबे,रवींद्र खरे,सचिन गुरव,कौस्तुभ पाटील,अरविंद कुरकुरे,कल्याण पाटील,तुषार पाटील,ठकसेन राणे,योगेश राणे,संदीप बाऊस्कर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय

येथील ध्वजारोहण सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले तर अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक परेडच्या माध्यमातून सलामी देण्यात आली.यावेळी उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे, तलाठी गजानन पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,कल्पना पाटील,डोंगर कठोरा समुदाय अधिकारी डॉ.हर्षल चौधरी,आरोग्य सेवक चेतन कुरकुरे,आरोग्य सेविका लता चौधरी,लुकमान तडवी,राहुल आढाळे,चंद्रकांत भिरूड,तुषार चौधरी,संजय आढाळे,डिगंबर खडसे,रमेश आढाळे,रुपेश पाटील,डालू कोल्हे,मुस्तफा तडवी,कोतवाल विजय आढाळे,रबील तडवी यांच्यासह आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.