यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ जानेवारी २५ शुक्रवार
प्रत्येक स्त्री सण-उत्सव साजरे करीत असतांना तसेच कामाच्या व्यापात व्यस्त असल्याने एक दिवस आराम मिळावा व तिच्याकरीता विशेष असावा म्हणून आशा स्वंयम सेविका व गटप्रर्वतक यांच्या वतीने तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हळंदी-कुकुवाचा कार्यक्रम उखान्यासह विविध कार्यक्रमांनी उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉस्वाती कवडीवाले यांच्या हस्ते सावीत्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले यांच्या उखाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करून उखाणे,संगीत खुर्ची,निंबु चमचा सह विविध कार्यक्रम साजरे करून प्रत्येक उपस्थित महिलांना पर्स,लक्ष्मी पादुका,हळदी कुंकू पात्र व तिळगुळ वाटप करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मनिषा कोळी,मोनिका फर्नाडिस,वृषाली पाटील,रमा पवार उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन सुनैना राजपूत यांनी केले तर गटप्रर्वतक चित्रा जावळे,लीना पाटील सह आशा स्वंयम सेविका यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला महिलांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.