सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात एके ४७ घेतल्याचे दिसत असून या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही दिसत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातील चाकण येथे ‘निबे लिमिटेड’ प्रकल्पातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,शस्त्र व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली यावेळी मंत्री उदय सामंत,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे,निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.चे संचालक प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विकासकामांचे आणि उपक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण केले यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची नवीन प्रशासकीय इमारत,पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाचे भूमिपूजन आणि महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतींच्या भूमिपूजनाचा समावेश होता.