कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २५ गुरुवार
नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून दोन मित्रांच्या मदतीने आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.कर्ज भागवण्यासाठी आजीकडे वारंवार पैशाची मागणी करून देखील आजी पैसे देत नसल्याच्या रागातून नातवाने हे कृत्य केले.याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा छडा लावत नातवाला आणि दोन मित्रांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असलेल्या सेनापती कापशी येथे मृत आजी सगुणा तुकाराम माधव (वय ८०) राहत होत्या. आजीच्या मुलगीचा मुलगा संशयित आरोपी गणेश राजाराम चौगले वय २२ रा.विक्रमनगर इचलकरंजी याने काढलेले कर्ज फेडण्यासाठी इचलकरंजीतील विक्रमनगर येथील राहतो.घर विकले होते तरीसुद्धा त्याच्यावर कर्ज होतेच.सगुणा आजीच्या नावे बँकेत दोन लाख रुपये शिल्लक होते म्हणून त्याने आजीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती पण आजीने नकार दिला.दरम्यान मंगळवार (दि ११) रोजी नातू गणेश चौगुलेने मित्राच्या मदतीने कशाच्या तरी सहाय्याने आजीचा गळा आवळून तिचे डोके आपटून तिला ठार केले व नंतर तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या आणि कानातील सोन्याची कर्णफुले काढून नेले.
दरम्यान हत्या झाल्याचे समजतात आजीच्या मुलाच्या नातवाने पोलिसात फिर्याद दाखल केली तसेच संशयित आजीकडे येत होता हे आजीच्या दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या मुलाच्या नातवाला माहिती होते.घटनेच्या दिवशी आजीच्या मुलाच्या नातवाने संशयित आरोपी गणेश चौगले आणि त्याच्या साथीदाराला पाहिले असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास सुरू केला.संशयितांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार विजय इंगळे,रोहित मर्दाने आणि प्रदिप पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगले हा बालाजी चौक,विक्रमनगर,इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्या अनुषंगाने पथकांनी बालाजी चौक, विक्रमनगर येथे सापळा लावून नातू, संशयित आरोपी गणेश राजाराम चौगले आणि त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे (वय २५) याच्यासह एका अल्पवयीनला इचलकरंजी शहरातून ताब्यात घेतले तसेच पोलिसांनी संशयित आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या,कर्णफुले आणि मोटरसायकल असा चार लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान सर्व संशयीतांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.