मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे.दरम्यान सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली.खडसेंनी आस्थेवाईकपणे चौकशी केली असता ‘चिंता करु नका, सगळं ओके आहे’असे राऊत म्हणाल्याचे खडसेंनी सांगितले आहे यावेळी मंदाकिनी खडसेही सोबत होत्या.”संजय राऊत म्हणाले ओके है सब,काही चिंता करू नका म्हणे,आताच बाहेर येणार म्हणे मी”असे खडसे म्हणाले.खोक्यासंदर्भात काही बोलले का?असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता,”खोके नाही,ओके आहे बोलले”अशी मिश्किल टिपण्णी खडसेंनी केली.”राऊत साहेबांशी लिफ्टजवळ भेट झाली माझी दोन मिनिटे ते बोलले,सब कुछ ओके है,तुम्ही काळजी करु नका”असे बोलल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले.
दरम्यान खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना काल पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते.तत्पूर्वी न्यायालयाच्या बाहेर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीवरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केले तसेच राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.”अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला.अंधेरीत सेना उमेदवार ऋतुजा लटके या ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होत्या भाजपने सर्व्हे केला होता त्याच सर्व्हेमध्ये भाजप उमेदवाराचा सपशेल पराभव होणार असे दिसत होते त्याच भीतीतून भाजपने हा निर्णय घेतला आहे.राहिला प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्राचा…तर राज ठाकरे यांचे फडणवीसांना लिहिलेले पत्र म्हणजे तो एक स्क्रिप्टचा भाग होता..” असे म्हणत राऊतांनी भाजप आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे.