यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
सामाजिक दिवा बांधणीच्या परंपरेला बाजुला सावरून सावित्री व रमाईच्या लेकिने साश्रूनयनांनी पिताल्या अग्निडाग दिल्याने सदर कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.तालुक्यातील अंजाळे येथील प्रमोद प्रल्हाद सपकाळे यांना वंशाचा दिवा मुलगा नाही मात्र एक सदस्य (मुलगी) आहे.नीता अविनाश वाघ,रा.वाघोदा ता.रावेर येथे वास्तव्यास असून सदर महिलेने सामाजिक दृष्टिकोण व भावना जोपासत आपल्या वडिलांना अग्निडाग देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे.
दरम्यान आईचा संभाळ करण्यासाठी अनेक ठिकाणी हेडसांड होते मात्र लहान मुलांच्या आठवणी तसे घडत नाहीत फक्त काय प्रमोद सपकाळे त्यांच्या उतार वयात त्यांच्या भगिनी उज्वला वाघ व प्रतिभा भालेराव यांनी आनंदात संभाळ केला तसेच त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे.दरम्यान प्रमोद सपकाळे हे मरण पावल्याने अचानक त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न समोर आला.त्यावेळी प्रमोद सपकाळे यांना अग्निडाग कोणी देईल ? म्हणून सचिन वाघ,विनायक भालेराव या दोन्ही भाच्यांनी विचार करून वंशाचा दिवा म्हणून नीता वाघ या मुलीने अंत्यसंस्कार करावा असा निर्णय घेण्यात आला.तद्नुसार नीता वाघ हिने स्वतःच्या हाताने वडील प्रमोद सपकाळे हिने अग्निडाग दिला तर त्यांची भाची स्वाती वाघ रा.अंजाळे हिने खांदा दिला.सदरहू मुलीने निभावलेली माणुसकीच्या वागणूकीची भावना डोळे पाणावणारी होती.प्रसंगी अनेकांच्या तोंडून सावित्री व रमाईच्या लेकींनी आपले कर्तव्य पार पाडले असे शब्द यावेळी एकावयास मिळाले.दरम्यान समाजातील कालबाह्य रूढी परंपरांना शह देवुन चक्क मुलींनी आपले कर्तव्य बजावून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.