यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
येथील वनविभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आज दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ३.५० वाजेच्या सुमारास सलई डिंकची चोरटी वाहतुक करतांना मोटरसायकलसह ३८७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहीती अशी कि,वन परिक्षेत्र अधिकारी,गस्ती पथक यावल यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मालोद ते आडगाव रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसले असता मोटार सायकल येतांना दिसून आली व त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता संबंधित मोटर सायकल व मुद्देमाल सलई डिंक फेकून पसार झाले.दरम्यान मोटर सायकल हिरो HF Deluxe विना नंम्बर किंमत रु २९५००/- व मुद्देमाल सलई डिंक ८४ किलो माल किंमत ९२४०/- असे एकूण रु. ३८७४०/- मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केला.गुन्हे कामी वनपाल गस्ती पथक यांनी ३/२o२५ दिनांक १७/०२/२o२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.सदरील कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.) धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज,उपवन संरक्षक यावल वन विभाग जमीर शेख,विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगिर यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील,वन परिक्षेत्र अधिकारी,वनक्षेत्रपाल गस्ती पथक श्री.स्वप्नील फटांगरे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली.सदर कार्यवाही दरम्यान वनपाल आर.एम.जाधव वनपाल,आर.बी.थोरात,सचिन तडवी पोलीस कांस्टेबल,वाय.डी.तेली वाहन चालक व कर्मचारी उपस्थित होते.