Just another WordPress site

तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत मोटे तर उपाध्यक्षपदी गिरीश महाजन व जगदीश माळी यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार

येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी सलग्न असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या विभागात कार्यरत संघाची यावल तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्षपदी श्रीकांत मोटे,उपाध्यक्षपदी गिरीश महाजन व जगदीश माळी तर सरचिटणीसपदी ललित महाजन व आदींची निवड करण्यात आली असून या संदर्भातील माहीती पत्र हे शासकीय पातळीवर देण्यात आले आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी प्रशासनीक व विविध प्रश्न सोडविण्यासाठी श्रीकांत मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे.यात तालुका अध्यक्ष श्रीकांत मोटे,उपाध्यक्षपदी गिरीश महाजन व जगदीश माळी,सरचिटणीस ललित महाजन,कार्याध्यक्ष आरीफ तडवी,कोषाध्यक्ष वसंत सोनवणे,विभागीय अध्यक्ष दिपक चव्हाण,संघटक अतुल चौधरी,प्रसिद्धी प्रमुख विपिन वारके,जेष्ठ मार्गदर्शक जितेन्द्र फिरके,कुंदन वायकोळे व राजाराम मोरे तर कार्यकारणी सदस्य विक्रांत चौधरी,कैलास पाटील,संजु तडवी यांची निवड करण्यात आली. दरम्यान संघटना संदर्भातील माहीती एका लिखीत पत्राद्वारे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती डॉ.मंजुश्री गायकवाड,पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर,पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना देण्यात आली आहे.दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता अहोरात्र परिश्रम घेणार असून सर्वात आधी शिक्षकांच्या सोडविण्यावर भर दिला जाईल असे नूतन कार्यकारणी अध्यक्ष श्रीकांत मोटे यांनी पोलीस नायक प्रतिनिधीशी बोलतांना म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.