तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे राज्य संचालक यांनी सोमवारी तमिळनाडू राज्यातील शिवगंगा जिल्ह्यातील एका तरुणाची चौकशी केली व तो एका जातीय हल्ल्यात जखमी झाला होता.मदुराई येथील सरकारी राजाजी रुग्णालयात तो सध्या उपचार घेत आहे.टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.एनसीएससी तमिळनाडूचे राज्य संचावर एस.रविवर्मन यांनी वरिष्ठ तपास अधिकारी एस.लिस्टर यांच्यासह सोमवारी शिवगंगा येथील मेलापिदावूर गावातील २० वर्षीय आर.अय्यास्वामी यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली.जिल्हा अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी ६२ हजार ५०० रुपयांची भरपाई देखील दिली आहे.यापूर्वी पथकाने शिवगंगा येथील मेलापिदावूर गावाला भेट दिली.एका दलित तरुणाने असा दावा केला की शिवगंगा जिल्ह्यातील थेवर समुदायाच्या सदस्यांनी त्याच्यावर बुलेट चालवल्यावरून वाद घातल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला.पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.बुधवारी रात्री साडेआठ वाजता मेलापिदावूर गावात ही घटना घडली.
दरम्यान २० वर्षीय आर.अय्यास्वामी हा पदवीपूर्व अंतिम वर्षाचा विद्यार्थी मोटारसायकलवरून घरी जात होता व त्याला रस्त्यात तीन व्यक्ती भेटले ते दारूच्या नशेत होते. तिघेही थेवर समुदायाचे होते.अय्यास्वामी देखील दारूच्या नशेत होता त्याने तिघांशी बोलण्यासाठी त्याची बाईक थांबवली.अय्यास्वामीने विनोथकुमारला टोपणनावाने चिडवले त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व यातूनच तिघांनी अय्यास्वाीमला शिवीगाळ केली आणि शस्त्राने हल्ला केला यामुळे त्याच्या डाव्या मनगटावर आणि उजव्या हातावर जखम झाली आहे त्याला शिवगंगाई मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली.तर बुलेट चालवल्यावरून वाद झाल्याने या तिघांनी हल्ला केल्याचा दावा या तरुणाकडून करण्यात आला आहे.याप्रकरणी थेवर समुदायातील विनोथकुमार (२१),अथीस्वरन (२५),वल्लारसू (२३) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा कलमांसह गुन्हा दाखल केला आहे.कुटुंबियांनी तिघांवर जातीवादी शिवीगाळ केल्याचा आणि अय्यास्वामी दलित समुदयाचा असल्याने त्याला बुलेट चालवण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे.शिवगंगा जिल्हा पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.