सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.१९ फेब्रुवारी २५ बुधवार
तालुक्यातील पाडळसे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दि.१९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालय व महाकलेश्वर मंदिर ट्रस्ट तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवछत्रपतींची प्रतिमा पूजन करण्यात आले.या ठिकाणी रांगोळी काढून व आकर्षक सजावट करून परिसर सुशोभित करण्यात आला.
यावेळी पाडळसे गावातील पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार तसेच सामाजिक कार्यकर्ते कुंदन कोळी,सुरज कोळी,संदेश भोई,संकेत भोई,कल्पेश कोळी,भरत चौधरी, मयूर कोळी,मयूर सपकाळे,बबलू कोळी,हेमंत कोळी,ललन कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकारण्याचा संकल्प करण्यात आला.