Just another WordPress site

यावल शहरात एका महिलेचा निर्घुण खून ;एका संशयिताला तात्काळ केली अटक

अनैतिक संबंध किंवा पूर्व वैमनस्यातुन खून झाल्याची शंका

यावल पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-चितोडयातील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शहरात आज सायंकाळी ७.३०च्या सुमाराला तरुण महिला नजमा खलील काझी या महिलेवर कुऱ्हाडीने वर करून खून करण्याची घटना घडली असून त्यात ती महिला गतप्राण झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी जावेद युनूस पटेल वय २८ राहणार यावल यास पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून तात्काळ अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की,शहरातील काझीपुरा भागातील रहिवाशी महिला नजमा खलील काझी (वय ३५ वर्षे ) या महिलेवर कुऱ्हाडीने दोन वर करण्यात आले व त्यात हि महिला जागीच गतप्राण झाली.सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया पुर्ण केली.यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.पवन जैन यांनी तपासणी करून सदरील महिलेस मृत घोषित केले हि बातमी शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली व त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

नजमा खलील काझी या तरुणीच्या हत्येमागे अनैतिक संबंध व पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी यावल येथीलच जावेद युनूस पटेल (वय २८ वर्षे ) या संशयिताला तात्काळ अटक केली आहे.काही महिन्यापूर्वी जावेद पटेल याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्यात तो सुदैवाने बचावला होता.परिणामी सदरील पूर्ववैमनस्याचे कारणही या खुनाला जबाबदार असल्याचे शहरवासियांमध्ये बोलले जात आहे.याबाबत नजमा बानो यांचे पती खलील जाकीर अहमद काझी यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी संशयित जावेद युनूस पटेल यास अटक केली असून पोलीस त्याची कसुन चौकशी करीत आहे.नजमा  बानो यांच्या पश्चात पती,तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.