लक्ष्मण कुदंन भोरे (वय ४०) मुळ रा.माझगावकर माळ झोपडपट्टी ता.जि.सातारा.सध्या रा.आझाद चौक,लक्ष्मी नगर ता.कोरेगाव जि.सातारा,उज्वला बाळकृष्ण मेकले (वय-३६) वर्षे मुळ रा.माझगावकर माळ झोपडपट्टी ता.जि.सातारा सध्या रा.आकाश वाणी समोर ता.जि.सातारा व अविनाश हरीश्चंद्र मोरे (वय ४५) वर्षे रा.उचाट ता. महाबळेश्वर जि.सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.दरम्यान गांजा या अंमली पदार्थासह पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पियो गाडी तसेच १ लाख २५ हजार रुपये किंमतीची एक निळ्या काळ्या रंगाची यामाहा कंपनीची मॉडेलची स्कुटी तसेच ३१ हजार १९७ रुपये किंमतीचा एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये असलेला हिरवट पाने,फुले,काड्या व बिया असलेला उग्र दर्प वास असलेला एकूण २ किलो ८४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.