Just another WordPress site

पाडळसे येथे आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार

जिल्हा कार्यकारी अधिकारी जळगाव श्री भदाणे साहेब यांचे सूचनेनुसार व महिला बाल विकास प्रकल्प यावल अंतर्गत सीडीपीओ अर्चना आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळसे बीड मधील अंगणवाडी मार्फत तालुक्यातील पाडळसे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आज दि.२० फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच गुणवंती पाटील व ग्रामपंचायत सदस्य पल्लवी तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शून्य ते तीन वयोगटातील पालकांच्या आरंभ मेळाव्यात सुरुवातीचे क्षण मोलाचे,खेळणी नको खेळ हवे,पालकांचा थोडा वेळ हवा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.सदर मेळाव्यास सरपंच गुणवंती पाटील,ग्रामपंचायत सदस्य पल्लवी तायडे,ग्रामविकास अधिकारी सी.एच.वाघमारे,पोलीस पाटील सुरेश खैरनार,पाडळसे बीडच्या पर्यवेक्षिका जया नाईक,कल्पना तायडे, शोभा पाटील,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील,सीमा जावळे,कांचन फेगडे,जितेंद्र फिरके,गणेश कोळी,मिर्जा सर,आरिफ सर आदींसह पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सुरेखा चौधरी यांनी केले तर आभार जया नाईक यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.