“लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच” !! राजू शेट्टी यांची टीका
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार
लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.लाडक्या बहिण योजनेमुळे किती योजनांना कात्री लावावी लागली हे सरकारने स्पष्ट करावे या योजनेमुळे सामाजिक योजनांना लाडकी बहिण योजनेचा फटका बसला असल्याची टिप्पणी त्यांनी केली ते अलिबाग येथे पिएनपी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते.गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान प्राप्त झाले नाही.सामाजिक योजनांना कात्री लावाची आणि सवंग प्रसिध्दी मिळेल अशा योजनांच्या पाठी धावायचे अशात हे सरकार फसले असल्याचा आरोप त्यांनी केला.लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे त्यामुळे आदिवासी,दलित,अल्पसंख्यांक योजनांना या योजनेचा फटका बसला असला असल्याचा आरोपही त्यांनी केला.