परसाडे येथे खड्यास लागलेल्या भिषण आगीत साडेचार लाखाचे नुकसान !! एक बैल ठार एक जखमी !! आमदार अमोल जावळे यांची आगग्रस्त ठिकाणाची पाहणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार
तालुक्यातील परसाडे येथे खळवाडीस अचानक आग लागून त्यात एक बैल जळून खाक झाला तर दुसरा बैल ९० टक्के जळालेला असून शेती अवजारे बैलगाडी व गोठ्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने चार ते साडेचार लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.परसाळे बुद्रुक या गावी खळवाडीस काल दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार रोजी परसाडे गावात राहणारे व हातावर पोट भरणारा येथील रहिवासी प्रभाकर शंकर पाटील व आशाबाई शंकर पाटील यांच्या प्लॉटला आग लागून त्यात एक बैल जोडून जागेवर जळून खाक झाला तर दुसरा होईल ९० टक्के जळालेला असून तो सुद्धा मरणानीशी झुंज देत आहे.
दरम्यान यावल नगरपरिषदेचा अग्निशामक बंब तात्काळ आग विझजवण्यासाठी बोलवण्यात आला.तर खड्यातील बैलगाडी,शेती उपयोगी अवजारे व चारा मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.आग विझवण्यासाठी येथील सरपंच पती डॉ.राजू तडवी,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.यावेळी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांना आगग्रस्त ठिकाणी भेट दिली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे त्याला धीर दिला.याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदरच्या हात मजूर असलेल्या या माणसास नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात योग्य ते सहकार्य करावे असे सूचना दिल्या.
याप्रकरणी तलाठी व सर्कल यांनी पंचनामा केला असून महसूल प्रशासनाकडे पंचनामा पाठवलेला आहे.आमदार अमोल जावळे यांनी या ठिकाणी भेट दिली याप्रसंगी परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच मीनाताई तडवी,अतुल भालेराव,रमेश साबळे,प्रल्हाद डालू चौधरी,रोशन दळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर आग्रस्त प्रभाकर पाटील हे बैलजोडी शेतांमध्ये भाड्याने देत होते व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते.लोकांच्या शेतामध्ये जाऊन आपली रोजी रोटी करून जिवन चरितार्थ भागवणाऱ्या प्रभाकर पाटील यांच्यावर या आगीमुळे घाला घातला गेला आहे ते भरून काढणे खूप मोठे अवघड आहे.परिणामी संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून मिळावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.