परवा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा काही शब्द वापरला की मला हलक्यात घेऊ नका.आता एकनाथ शिंदे नेमके कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही मग मशालीने (ठाकरे गट) हलक्यात घ्यायचे नाही की अजून कोणाला घ्यायचे नाही ? असा सवाल अजित पवारांनी विचारला.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर दिल.“मला हलक्यात घेऊ नका हे अडीच वर्षांपूर्वीचे होते” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.दरम्यान अजित पवार यांनी यावेळी म्हटले की,“एकनाथ शिंदे आणि मी एका व्यासपीठावर आलो की आमच्यावर कॅमेरे क्लोज असतात.एवढेच नाही तर आमच्या हावभावावरही लक्ष असते म्हणजे आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का नाही ते देखील पाहिले जाते त्यामुळे मी माझ्या मनाला नेहमी सांगतो की चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे नाहीतर दुसरी बातमी व्हायची असे म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली तसेच आमच्या अर्थात महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.