“खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन खपून घेणार नाही” !! विशेष महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांचा पोलिस दरबारात इशारा !!
पोलीस दलातील तणावपूर्ण वातावरणामुळे अनेकांना आरोग्य विषयक समस्या उद्भवतात त्यामुळे नोकरी करतांना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे असाही सल्ला त्यांनी दिला.पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये यापूर्वी पोलिसांना समाधानकारक जेवण मिळत नव्हते मात्र पोलीस अधीक्षक ओला यांनी याकडे लक्ष दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून चांगले जेवण मिळत असल्याचे पोलिस अंमलदारांनी सांगितले.पोलीस दरबारात विशेष महानिरीक्षक कराळे यांच्यापुढे पुरुष व महिला अंमलदारांनी विविध स्वरूपाच्या प्रशासकीय व वैयक्तिक अडचणी मांडल्या.वयाची अट ठेवून कवायतीसाठी नियम करावेत,वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलिसांना कार्यमुक्त करा.दहा-वीस-तीसचा वेतन फरक द्यावा,पोलीस बँड पथकाच्या मानधनात वाढ करा,श्वानपतकातील पोलिसांना जोखीम भत्ता मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या तक्रारींची दखल घेत महानिरीक्षक कराळे व पोलिस अधीक्षक ओला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.कोणतीही मोठी अनुचित घटना घडू न देता शांततेत निवडणुका पार पाडल्या.धार्मिक व जातीय तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली याबद्दल विशेष महानिरीक्षक कराळे यांनी पोलीस अधीक्षक ओला व जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले व पुढील काळातही ही कामगिरी कायम ठेवा अशीही सूचना त्यांनी केली.