Just another WordPress site

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाई

आकाशातून पाणी देवू का ? -राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी गाजले होते.मला पाणीवाला बाबा बनायचेय असे उद्गार पाटील यांनी काढले होते.मात्र हे सांगणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यात भर हिवाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाणी टंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.तब्बल तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.त्याचबरोबर विहिरीवर पाण्यासाठी जीव घेणी कसरत करावी लागतेय.शाळकरी विद्यार्थ्यांवर पाणी भरण्याची वेळ आलेली असून  शाळा बुडवून काही विद्यार्थांना पाण्यासाठी घरी राहावे लागत आहे.यासंदर्भात गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी आकाशातून पाणी देवू का ? असे म्हटले आहे त्यांच्या वक्तव्याबाबत गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे धरणगाव तालुक्यातील आहेत.धरणगाव शहरात तब्बल महिनाभरांपासून या ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय.हिवाळ्यातच तीव्र अशा पाणी टंचाईमुळे घरातील महिला पुरुषांसह शाळकरी मुलांनाही पाण्यासाठी घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर जावे लागत आहे आणि याच कारणामुळे मुलांना शाळा बुडवण्याची वेळ आली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातला हा धरणगाव तालुका विशेष म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा तालुका आणि मतदारसंघ सुद्धा आहे.या धरणगाव शहरात चक्क हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.एक दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसाआड तर कधी महिनाभरानंतर तर कधी याठिकाणी पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.याकरिता पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जावून जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी काढावे लागत आहे. तर पाणी भरण्यासाठी शाळकरी मुलांनाही शाळा बुडवावी लागत आहे.घरातील सदस्य दिवसभर पाणी भरतात तर मग काम करायचे कसे व घरात खायचे काय?आणि जगायचे कसे असे प्रश्न महिला वर्गातून उपस्थित केले जात आहेत.यात पाण्याची समस्या सोडविण्याकरिता कधी टँकर तर कधी जर मागून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रशासनावर कुठलाही वचक दिसत नाही त्याचबरोबर नगर पालिकेचा नियोजनशून्य कारभारा मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.मंत्र्यांनी राज्यात २२ हजार पाणी पुरवठा योजना मंजूर करून विक्रम केला असेल मात्र त्यांच्यात तालुक्यात नागरिकांना पाणी मिळत नसेल तर त्याला काय अर्थ आहे?अनेकवेळा निवेदन देऊन व आंदोलन करून कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नाही असच यावरून दिसून येत असल्याची टीका विरोधक माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केली आहे.त्याचबरोबर राज्यात पाणी पुरवठा योजनांच्या कामे करून विक्रम केल्याचे मंत्री गुलाबराव पाटील सांगतात,मात्र त्यांच्याच तालुक्यात नागरिकांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल तर मंत्र्यांनी विक्रम करण्याला खरच अर्थ उरतो का?असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.