मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार
पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.दत्तात्रय रामदास गाडे असे या प्रकरणातल्या आरोपीचे नाव आहे.दरम्यान या धक्कादायक घटनेचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत.विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे.यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बलात्काराच्या घटनेवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.“शांत……… सरकार झोपले आहे,” असे म्हणत या पोस्टमधून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आव्हाडांनी त्यांच्या पोस्टमध्ये आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच पीडित मुलीला झालेला प्रकार कुणाला तरी सांगावा वाटला नाही यात समाज म्हणून आपल्या सर्वांचा पराभव आहे असेही आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट…
“राज्यातील पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता आणि महिलांची सुरक्षितता रसातळाला गेल्याची परिस्थिती आहे.स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला कित्येक तास उलटून गेले तरी आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही.याउलट पोलीस प्रशासन पीडित तरुणीलाच दोष देण्याचे काम करत आहे. घडलेल्या प्रसंगानंतर तरुणीची मानसिक स्थिती काय असेल याची एकुलत्या एका मुलीचा बाप म्हणून कल्पनाही करवत नाही.झाला प्रकार या तरुणीला लगेच कुणाला तरी सांगावा वाटला नाही यात आपल्या सर्वांचा समाज म्हणून मोठा पराभव आहे.सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिला असुरक्षित आहेत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने महिला सुरक्षेचे अनेक प्रश्न उभे राहतात,” असे म्हणत आव्हाडांनी स्वारगेट बस स्थानकातील प्रशासकिय व्यवस्थेबद्दलच्या काही समस्या मांडल्या आहेत.
१) स्वारगेटचे नेहमीचे प्रवासी सांगतात की, स्वारगेट बस स्थानकात रात्री पुरेसा प्रकाश नसतो.
२) बस गाड्या नियोजित फलाटावर लागत नाहीत.
३) आगार व्यवस्थापक चौकशीसाठी येणाऱ्या प्रवाशांना व्यवस्थित माहिती देत नाहीत.
४) रात्री मुक्कामी असणारी बस लॉक का नव्हती?
५) घटनास्थळापासून स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही तिथे पोलीस रात्रभर गस्त का घालू शकत नाहीत?
पुढे बोलताना आव्हाडांनी राज्याचे मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली आहे.“मुळात एखादा गुन्हा घडल्यानंतर पीडित व्यक्तीला पोलिसांकडे जाण्याची भीती वाटत असेल तर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत ही एक अफवाच उरते.मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांसाठीही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.पोलिसांकरवी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यापेक्षा पोलीस खात्यातील आणि राज्य परिवहन महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी माझी मागणी आहे,” असेही आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
पुणे शिवशाही बस बलात्कार प्रकरणात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “थेट फाशी…” !!
पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे.आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना करण्यात आली आहेत.काल पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली.त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली.पोलिसांचा तपास सुरु आहे.माझे सीपींशी बोलणे झाले आहे त्यात संशयितदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे.आरोपी अजून सापडलेला नाही.पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली.काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणे अतिशय क्लेशदायक आहेत याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय तरी या घटना घडत आहेत.सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे.तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसत आहेत. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते.काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे.त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला असेही अजित पवार म्हणाले.
‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून आणखी काही गुन्हे ? पसार आरोपीच्या शोधासाठी १३ पथके रवाना !!
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.परगावी निघालेल्या तरुणीवर सराइताने बलात्कार केला याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे वय ३५,रा.शिक्रापूर,ता शिरुर,जि.पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गाडे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते.गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे.गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत.गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली.चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून गाडेचा शोध घेण्यात येत आहे.गाडेचे आई-वडील आणि भावाची चौकशी करण्यात येणार आहे व त्यांना चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
मैत्रीण चौकशीसाठी ताब्यात !!
गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे.पोलिसांनी तिची चौकशी केली.चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक मागितले होते व त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.गाडेने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलिसांना आहे.त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
एसटी बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी !!
आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी स्थानकात वावर असायचा.मंगळवारी सकाळी परगावी निघालेल्या तरुणीकडे त्याने एसटीतील वाहक असल्याची बतावणी केली आहे. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला.त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे.एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.संबंधित बसचालकाचा पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे.