पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार
सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीने तरुणीशी गोड बोलून तिच्यावर स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली व या प्रकरणी आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी १३ पथके तैनात करण्यात आले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नसल्याने पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला तब्बल १ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.पीडित तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली होती व तिला तिच्या गावी जायचे होते.बसची वाट पाहत असतांना तिला स्वारगेट एसटी स्थानकात तिला दत्तात्रय गाडे नावाचा व्यक्ती भेटला.गाडेने तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला तसेच बस येथे लागत नसून पलीकडे लागत असल्याचे त्याने तिला एका रिकाम्या शिवशाही बसजवळ नेले व या बसमध्ये आतमध्ये चढण्यास सांगून आरोपीही तिच्या मागून बसमध्ये गेला व तिथेच त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.
सदरील प्रकार घडल्यानंतर भयभीत झालेली तरुणी पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने निघालेली असतांना तिने तिच्या मित्राला सर्व प्रकार सांगितला व तिच्या मित्राने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करायला सांगितल्यानंतर तिने स्वारगेट पोलिसांत पोलीस तक्रार केली व त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.प्रकार उजेडात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित तरुणीने केलेल्या वर्णनानुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली व यानुसार या आरोपीविरोधात आधीही अनेक गुन्हे दाखल असून तो सराईट गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्याच्या शोधासाठी आता १३ पथके तैनात करण्यात आली असून श्वानपथकही कार्यरत करण्यात आले आहे.तो कोणत्या ग्रामीण भागात लपून बसला असेल तर त्याला शोधून काढण्याकरता पोलिसांनी एक लाखांचे बक्षिसही जाहीर केले आहे याबाबतची माहिती उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी १ लाखांचे बक्षिस
स्मार्तना पाटील म्हणाल्या,आरोपीला पकडून देण्याकरता १ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले असून आरोपीच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.त्याच्या भावाला चौकशीकरता ताब्यात घेण्यात आले आहे.