घटनेची माहिती बिलोली पोलिस ठाण्यात समजताच पो.नि.अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनात सावळी बिट जमादार कुमारप्रसाद गायकवाड,ए.जी.शिंदे व गावचे पोलीस पाटील बालाजी कंदमवार यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याच्या मृतदेहाची कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अत्यंत हलाखीची परिस्थिती व घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर खूप मोठी आपत्ती कोसळली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मयत तरुण सुरेश देवकरेच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,आई-वडील,भाऊ असा परिवार आहे.