ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरात ८ ते १० जणांचे टोळके सकाळी दूधाच्या किटल्या घेऊन संबंधित ठिकाणी येऊन एखाद्या टपरीवर किंवा झाडाच्या बाजूला घाटमाथ्यावरून येणारे गायीचे दूध घेऊन त्यामध्ये भेसळ करत असल्याचे उघडकीस आले व हे दूध शहरातील नागरिकांना म्हैशीचे दूध म्हणून वितरीत करत होते मात्र वितरण करताना हे दूध थंड असल्याचा ग्राहकांना संशय येत होता.परंतु याबाबत गुप्त माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी स्वतः यावर लक्ष देवून दूध भेसळ करणाऱ्यांच्या टोळीवर कारवाई केली.या प्रकरणात स्थानिक दूध विक्रेत्यांचा देखील हात असल्याने एका स्थानिक दूध विक्रेत्याला सोळा हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.