दरम्यान पोलीसांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र सतप्त जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता.अपघाताचे चित्रिकरण करण्याचा प्रय़त्न करणाऱ्यांनाही संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.अलिबाग पोलीसांसह,स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस मुख्यालयातील वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.यानंतर शिघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकासही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला व ही परिस्थिती लक्षात घेऊन आंबेडकर चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक पोलीसांनी रोखून धरली होती.या परिसरातील दुकाने आणि हॉटेल्सही काही काळ बंद करण्यात आली आहे.अलिबाग आगारातून होणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत.