या ‘प्रश्नोत्तरात’ही तरुण उडवाउडवी करत असल्याचे पाहून तरुणीचा पारा चांगलाच चढला मग तरुणीने या विकृताचा शर्ट डाव्या हाताने पकडून त्याच्या कानशिलात लगावायला सुरुवात केली.हा गोंधळ पाहून आसपासचे लोकही तरुणाला बोलू लागले.एका व्यक्तीन हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद केला.या व्हिडीओत सदर तरुणी विकृताला कानशिलात लगावत असल्याचे दिसत आहे.अवघ्या मिनीटभराच्या वेळात तरुणीनं या विकृताला तब्बल १३ वेळा कानशिलात लगावल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
शेवटी तरुणीच्या हातचे फटके टाळण्यासाठी हा विकृत उपस्थितांकडे गयावया करू लागला पण कुणीही त्याला सोडवण्यासाठी पुढे आले नाही.“मला वाचवा,मी परत असे करणार नाही”, असे हा विकृत म्हणताना दिसत आहे पण तरुणीने त्याला मारणे चालूच ठेवल्यामुळे शेवटी तो खाली पडला व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीनेही “तू नेहमीच इतरांना त्रास देतोस,इथे सगळ्यांना तुझा वैताग आला आहे” असे म्हटल्याचे व्हिडीओच ऐकू येत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत संबंधित विकृताला अटक केली आहे.कानपूर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भातली माहिती देणारा व्हिडीओही शेअर केला आहे.एकीकडे काही महिला अशा विकृतांच्या शोषणाच्या बळी पडत असतांना काही महिला मात्र अशा विकृतांना अद्दल घडवण्यासाठी स्वत: पुढे सरसावत असून स्वसंरक्षणाचा आदर्श घालून देत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.