Just another WordPress site

पाडळसे येथे महाशिवरात्री निमित्त महाकालेश्वर मंदिरात जागरण उत्साहात !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.२८ फेब्रुवारी २५ शुक्रवार

महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त दि.२६ फेब्रुवारी रोजी महाकालेश्वर मंदिर ट्रस्ट येथे महिलांनी मोठ्या उत्साहात जागरण केले.प्रसंगी संपूर्ण शिवनगरी भक्तिमय वातावरणाने दणाणून गेली होती.

या पवित्र दिवशी महिलांनी रात्री १२ वाजेपर्यंत भगवान शंकराच्या नामस्मरणात तल्लीन होत भजन,गीते आणि आरत्यांद्वारे जागरण केले.मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या उत्सवाची शोभा वाढवली.”हर हर महादेव” आणि “श्री शिवाय नमस्तुभ्यम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.महाकालेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी फराळ व गोळ दूध वाटप करण्यात आले तसेच मंदिराचा संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने नटवण्यात आला होता.या सोहळ्यात स्थानिक श्रद्धाळूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.भक्तीमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक आनंद देणारा ठरला. महाशिवरात्री निमित्त झालेल्या या जागरणामुळे भक्तांना विशेष अनुभूती मिळाली.या सोहळ्यादरम्यान पुरुषवर्ग व महिलांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.