मृत सुरेश शिंदे हे गेल्या १७ फेब्रुवारी रोजी बार्शी येथून आपल्या गावी जात असतांना बेपत्ता झाले होते.कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत मात्र २० फेब्रुवारी रोजी दुपारी बाभुळगाव शिवारातील एका उसाच्या शेतामध्ये उसाला पाणी देत असतांना मातीतून एक मानवी पाय आढळून आला त्याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.जमिनीमध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली.मृतदेहाचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते आणि गळ्यावर फास देऊन आवळल्याच्या खुणा होत्या.पांगरी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असता संशयावरून सालगडी राहुल गायकवाड आणि दिलीप झोंबाडे यांना ताब्यात घेण्यात आले.प्राथमिक व तांत्रिक तपासातून या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले.मृत सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला आणि गुन्ह्याचा पुरावा लपविण्यासाठी मृतदेह शेतात पुरण्यात आला होता.