बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची आमदार संजय गायकवाड यांना बुलढाणा जिल्हाध्यक्ष महादेवराव पाटील तथा राज्य संघटक यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आ.संजय गायकवाड यांच्या कार्यालयात त्यांच्याशी चर्चा करून सविस्तर लेखी निवेदन नुकतेच देण्यात आले.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक हजार रुपये वाढीचा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाला सादर केला होता व पुन्हा तोच प्रस्ताव नूतन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दि.२३ डिसेंबर २५ रोजी अर्थ विभागाला सादर केलेला आहे.त्याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी येत्या अधिवेशनात शालेय पोषण आहार कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेला एक हजार रुपये मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत विधानसभेत प्रश्न मांडून सदरील शालेय पोषण आहार कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा यासाठी संघटनेच्या वतीने त्यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे.यावेळी माधवराव पाटील यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिभा वडे,मोतीसिंग राजपूत,ज्योत्स्ना गवई,ललिता थोरात,यशोदा जाधव,कोमल राजगुरे,विनोद उंबरकर,वैशाली खराटे,रत्नकला तायडे,गीता चहाकर इत्यादी शालेय पोषण आहार पदाधिकारी उपस्थित होते.