मलकापूर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संचेती यांना आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष महादेवराव पाटील तथा राज्य संघटक यांनी त्यांच्या कार्यालयात भेटून मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करावा आणि संघटनेचे प्रतिनिधी आणि संबंधित मंत्री यांची या कामगाराच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक बोलावी याबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले.
दरम्यान पांडेचेरी राज्यात १४ हजार,केरळ राज्यात दहा हजार व तामिळनाडूमध्ये ७४०० याप्रमाणे महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कामगारांना मानधन देण्यात यावे आणि एक हजार रुपये मानधन वाढ आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करावा आणि संघटनेचे प्रतिनिधी आणि संबंधित मंत्री यांची या कामगाराच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक बोलावी अशा प्रकारची चर्चा करून त्यांना लेखी निवेदन देण्यात आले.प्रसंगी प्रतिभा बडे,अरुण सनीशे,संजय वाघोदे,मीरा गावंडे,अनुसया घुले,ज्योतीबाई पांडुरंग शिंगोटे,महेंद्र दलाल,सुमित शालिनी डाके,मोतीसिंग राजपूत,सातव ताई आणि नाफडे ताई यांच्यासह मलकापूर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.