दरम्यान २ मार्चच्या रात्री शिवणी गावामध्ये शेतात बेशुद्धावस्थेत एक २३ वर्षीय तरुणी आढळली व तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर खोल जखमा असल्याने तिला ग्रामस्थांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नागपूरला हलविण्यात आले असून वैद्याकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.ही तरुणी शौचासाठी गावालगत गेली होती व तासा भरानंतरही ती परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती बेशुद्धावस्थेत आढळून आली.तिच्या हातावर,डोक्यावर,छातीवर आणिगुप्तांगावर जखमा असून डोळ्याखाली दगडासारख्या तिक्ष्ण वस्तूने मारहाण केल्याचे व्रण आहेत.पीडितेवर उपचार सुरू असल्याने जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण झाली नव्हती.पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे शिरूरच्या कारेगाव येथे १९ वर्षीय तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी अमोल पोटे (२५) आणि किशोर काळे (२९) या आरोपींना अटक केली असून त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले.पीडित युवती शनिवारी रात्री मामेभावाबरोबर गप्पा मारत असतांना दोघांनी चाकूचा दाखवून दोघांना मारहाण करत तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.तरुणीच्या भावाकडील सोन्याचे दागिनेही आरोपींनी पळविले.या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.