यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भुतदया दाखवीत पक्षांकरिता पाणी व अन्नाची सोय करून आपलेही निसर्गाशी काही देणे लागते हे कर्तव्य जोपासत विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान उन्हाच्या तप्त झळांनी नागरिकांची लाहीलाही होत असतांना छोट्या पक्षांच्या अवस्थेचा विचार केला तरी मन सुन्न होऊ शकते.परिसरात अजूनही पक्षांना अन्न व पाण्यासाठी भटकंती करावी लागते असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भूतदया दाखवीत एकत्र येऊन उन्हाळ्याची चाहूल लागत असतांना अन्न व पाण्यासाठी फिरणाऱ्या पक्षांसाठी अन्न व पाण्याची तजवीज करण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुपासून पक्षांसाठी प्लास्टिकच्या बॉटलचा योग्य तो वापर करून पाण्याची सोय केली तसेच बाजरी,ज्वारी,गहू,दादर हे एकदल धान्य आणून बर्ड फिडरमध्ये टाकून महाविद्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी असलेल्या झाडांवर,बॉटनिकल गार्डन तसेच महाविद्यालय आवारामध्ये ठेवून पक्षांसाठी भूतदया दाखवली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.एस.पी.कापडे,डॉ.एच.जी.भंगाळे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना डॉ.आर.डी.पवार,अमृत पाटील प्रा.अश्विनी कोल्हे,प्रा.रूपाली शिरसाठ,कु.नंदिनी महाजन, तृप्ती पाटील,हितेश्री महाजन यांनी सहकार्य केले.