जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर घेऊन येणाऱ्या भरधाव क्रूझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत.सुसाट वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे.कांतिलाल हिरालाल पावरा वय २६ वर्षे,रा.चांदसुरिया,पो.वासुडी,ता.शिरपूर,जि.धुळे असे मृत मजुराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया येथील जगदीश जंगलू पावरा याने जळगाव एमआयडीसी परिसरातील वेअरहाउस कंपनीत ट्रकमधील गहू व तांदळाची पोती उतरविण्याचा ठेका घेतला आहे.गावातील काही मजुरांना सोबत क्रूझरने घेऊन हमालीचे काम करतो.जगदीश पावरा क्रूझर गाडी चालवीत असल्याने दररोज मजुरांना ने-आण करावी लागत होती.सोमवारी दि.१७ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे साडेचारच्या सुमारास सर्व मजूर गाडीत बसून जळगावकडे रवाना झाले.क्रूझर वाहन जगदीश पावरा चालक चालवीत होता.जळगावच्या दिशेने विदगाव-ममुराबाददरम्यान वाहनावरील चालक जगदीश पावरा याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन थेट झाडावर आदळून बाजूच्या चारीत कोसळले.अपघातात कांतिलाल हिरालाल पावरा याचा जागीच मृत्यू झाला तर रणजित ऊर्फ राजा जयसिंग पावरा वय २४ वर्षे,गोकुळ वनासिंग भिल वय ३०वर्षे,वांगऱ्या कालूसिंग पावरा वय ३० वर्षे असे तिघे मजूर गंभीर जखमी झालेआहे सदरील तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.