Just another WordPress site

यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयावर डीबीटी अनुदान वाढीच्या मागणीकरिता विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ मार्च २५ शुक्रवार

शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जळगाव येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच ठिय्या आंदोलन करण्यात आले.दरम्यान यावल बस स्थानकावर सर्व विद्यार्थी एकत्र जमून तेथून प्रकल्प कार्यालयापर्यंत डीबीटी अनुदान वाढ करण्यात यावी या  मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर दुपारी एक वाजेपासून येथे ठिय्या आंदोलन केले.यावेळी तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा या आंदोलन सहभाग होता.याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांनी माेबाईल कॉलवर मागण्या संर्दभात आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर जळगाव विद्यापिठ परिसरात असलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.सन २०१८ पासुन वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणीक सह भोजन आदी करीता डीबीटीच्या माध्यमातुन अनुदान दिले जाते मात्र त्यात गेल्या ८ वर्षांपासुन वाढ न झाल्याने व महागाई वाढल्याने विद्यार्थ्यांच्या त्या रक्कमेतुन खर्च भागत नाही म्हणुन डीबीटीच्या रक्कमेत वाढ व्हावी या मागणीकरीता सदर आंदोलन करण्यात आले.यापुर्वी देखील वारंवार निवेदन देवुन मागणी मान्य न झाल्याने जोपर्यंत थेट आदिवासी विकास मंत्री विद्यार्थ्यांना ठोस लेखी आश्वासन देत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भुमीका विद्यार्थ्यांनी घेतली होती.दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणुन घेत प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी नासिक विभागीय आयुक्तांशी थेट विद्यार्थ्यांचेे बोलणे करून दिले मात्र ठोस आश्वासन मिळाल्या शिवाय माघार घेणार नाही अशी भुमीका विद्यार्थ्यांनी घेतली होती.दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला व त्यांनी विधीमंडळासमोर विद्यार्थ्यांच्या मांगण्या मांडणार व यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.प्रसंगी प्रकल्प कार्यालयाकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने यावलचे पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.