यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मार्च २५ सोमवार
मागील गेल्या दोन-तीन दिवसांपासून वन विभागाच्या अथक शोध मोहीमेनंतर देखील बिबट्या मिळून आला नसुन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र बिबट्या जंगला फिरत असल्याची दहशत अद्याप कायम आहे.दरम्यान नागरीकांनी बिबटया व ईतर हिंसक प्राण्यांपासुन सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले आहे.
दरम्यान तालुक्यातील साकळी येथील मानकी शिवारात नुकताच एका सात वर्षीय आदिवासी बालकावर बिबट्याने हल्ला करीत त्या निरागस बालकाचा बळी घेतला असून या घटनेमुळे यावल तालुक्यात विविध ठीकाणच्या शेत शिवारात बिबट फिरत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.या चर्चेस यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी गांर्भीयाने घेत आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांच्यासह वन विभागास घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्तक राहण्याचे आदेश दिले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन तालुक्यात विविध ठिकाणी हिंसक प्राण्यांसंदर्भात सर्वसामान्य नागरीकामध्ये जनजागृतीसाठी युद्धपातळीवर अभियान राबविण्यात येत आहे.दरम्यान जंगलात शेती काम करणाऱ्या शेतकरी किंवा ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांनी अशा प्रकारे कुठलाही प्राणी दिसुन आल्यास आपल्या जवळच्या वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ कोणतेही निलंब न लावता या बाबत माहिती कळवावी व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता एक जबाबदार व सुज्ञ नागरीकांची भुमिका पार पाडावी अशी माहीती यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले आहे.