Just another WordPress site

जिल्हा सह पीक संरक्षक सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत नितीन चौधरी व अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ मार्च २५ मंगळवार

जळगाव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायट्यांचे फेडरेशन जळगाव या संस्थेच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीत यावल तालुक्यातून नितीन व्यंकट चौधरी अट्रावल व अविनाश रामचंद्र पाटील सावखेडासिम यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडीबद्दल त्यांचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वतीने नितीन व्यंकट चौधरी व अविनाश रामचंद्र पाटील या दोन्ही संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सूर्यभान निंबा पाटील तसेच जळगाव जिल्हा पीक संरक्षक सोसायटी फेडरेशन विद्यमान चेअरमन वसंत पंडितराव कोल्हे,प्रदीप सदाशिव पाटील चुंचाळे व शामराव अशोक पाटील मोहराळा यांच्यासह आदी संचालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.