मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही व निश्चित कालावधी करताच भोंगे लावता येतील व त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी.ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल तसेच या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही ? हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल.जर पोलीस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीचे उत्तर देताना स्पष्ट केले.पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही ? याची तपासणी केली पाहिजे.भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कडक कारवाईसाठी नियमात बदल करणार !!

प्रचलित कायद्यानुसार पोलिसांकडे फारसे अधिकार नाहीत कारण कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला आहेत त्यामुळे नियमांमध्येही काही प्रमाणात बदल करणे अपेक्षित आहे व हे बदल झाल्यास भोंग्यावर अधिक प्रभावी कारवाई करता येईल.यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नियमांमध्ये बदल करण्यास सुचविले जाईल असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.