माऊली फाउंडेशनच्या उपक्रमाद्वारे १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान !! ४ दाम्पत्य व ८ महिलाचा रक्तदात्यांमध्ये सहभाग !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१२ मार्च २५ बुधवार
गेल्या ९ वर्षांपासून भडगाव शहर व परिसरात विविध सामाजिक,विधायक व कृतीशील उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने सलग आठव्या वर्षी माऊली रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.या शिबिराला भडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व या शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरम्यान येथील चाळीसगाव रोडवर असलेल्या अंजली हॉस्पिटलच्या प्रांगणात संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी फाउंडेशनच्या महाराष्ट्र टीमच्या उपाध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी,स्वयंसेविका मनिषा पाटील व मीरा जाधव यांचा रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.दीपमाला व योगेश शिंपी यांनी सलग आठव्या वर्षीही माऊली फाउंडेशनने शिबिर आयोजित केले त्याबद्दल त्यांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने फाउंडेशनचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यशस्वितेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या संचालिका संगीता जाधव,महाराष्ट्र टीम अध्यक्ष योगेश शिंपी,उपाध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी,संजय सोनार,हाजी जाकिर कुरेशी,गणेश पाटील,प्रवीण पाटील,रवींद्र पाटील,भीमराव सूर्यवंशी,मनोहर जाधव,मुकेश जाधव,दिलीप महाजन,सोनाली थडकर,वैशाली पाटील,करिमा खान,संगीता अहिरे,रुपाली सैंदाणे,सुरेश कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.तर डॉ.प्रियंका व डॉ.प्रतीक भोसले,गौरी व रवींद्र पाटील,ज्योत्स्ना व संदीप सपकाळ या दाम्पत्यांनी जोडीने रक्तदान केले.त्यांच्या समवेत वैशाली पाटील,मनिषा पाटील,पूनम कंडारे व आरती पाटील ह्या महिलांनीही रक्तदान केले तसेच रोकडा फार्म येथील ज्ञानेश्वर पाटील ह्या दिव्यांग बांधवाने सलग तिसऱ्यांदा रक्तदान केले हे विशेष ! .